महाराष्ट्र शासनाच्या 0478 पदांसाठी आदिवासी विकास विभागात कायमस्वरूपी नोकरीची मोठी संधी.

तुम्ही जर बऱ्याच दिवसांपासून एका सुरक्षित सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि कमी शिक्षणात एखादी चांगली संधी हवी असेल तर ही बातमी तुमच्या नक्कीच कामाची आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने नुकतीच 2026 या वर्षासाठी एक अत्यंत महत्त्वाची भरती जाहीर केली आहे. आपल्या राज्यातील एकूण 29 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांच्या अंतर्गत ज्या शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहे चालवली जातात तिथे चौकीदार या गट-ड पदासाठी ही भरती होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातून या पदासाठी तब्बल 478 जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळे नोकरी मिळवण्याची ही खरोखरच एक उत्तम संधी आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

या भरतीची सर्वात जमेची बाजू म्हणजे यासाठी तुम्हाला खूप मोठ्या शिक्षणाची गरज नाही. जर तुम्ही किमान 10 वी पास असाल आणि तुमचे वय 18 वर्षे पूर्ण असेल तर तुम्ही लगेच या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. काही प्रकरणांमध्ये 12 वी किंवा पदवीधर तरुणही या कायमस्वरूपी सरकारी नोकरीसाठी आपला विचार करू शकतात. निवड झाल्यानंतर तुम्हाला 15000 ते 47600 रुपयांपर्यंत चांगले मासिक वेतन मिळेल आणि सोबतच सरकारी नोकरीचे इतर सर्व फायदे व सुरक्षितता सुद्धा मिळेल.

या पदासाठी उमेदवारांची निवड प्रामुख्याने संगणकावर आधारित लेखी परीक्षेवर ठरणार आहे. ही सीबीटी परीक्षा दिल्यावर पुढे कागदपत्रांची पडताळणी होईल आणि मग अंतिम यादी लावली जाईल. तुम्हाला तुमचा अर्ज आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे. फॉर्म भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करून योग्य ते शुल्क भरायला विसरू नका. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की 27 मे 2026 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न बघता वेळेत आपला अर्ज सबमिट करा आणि फॉर्म भरण्यापूर्वी विभागाची मूळ पीडीएफ जाहिरात एकदा सविस्तर वाचून काढा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा