‘मुंबई महानगरपालिका’ मध्ये चांगल्या वेतनाची नोकरी मिळवा | आजचं अर्ज दाखल करा.

pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

मुंबई महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवरील खालील नमूद अतिदक्षतातज्ञ (Intensivist) 03 पदे 02 वर्षाकरिता कंत्राटी तत्वावर प्रत्येकी 6 महिनेनंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन उरोरोग अतिदक्षता विभागासाठी अतिदक्षतातज्ञ (Intensivist) डॉक्टर्स (MBBS+Post Graduation Diploma+one ICU experience) यांना रु.1,25,000/- (रुपये एक लाख पंचवीस हजार फक्त) दरमहा, अतिदक्षतातज्ञ (Intensivist) डॉक्टर्स (MBBS+Post Graduation Degree) यांना एक वर्षापेक्षा कमी अनुभव असल्यास रु. 1,25,000/- (रुपये एक लाख पंचवीस हजार फक्त), 1 ते 5 वर्ष कामाचा अनुभव असल्यास रु.1,35,000/- (रुपये एक लाख पस्तीस हजार फक्त), 5 ते 8 वर्ष कामाचा अनुभव असल्यास 1,50,000/- (रुपये एक लाख पंन्नास हजार फक्त) तसेच 8 किंवा जास्त वर्ष कामाचा अनुभव असल्यासरु. 2,00,000/- (रुपये दोन लाख फक्त) इतक्यादरमहा, वेतनावर भरण्याकरिता खालील नमूद अर्हता धारण केलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. 31 डिसेंबर 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत. नियम व अटी : अतिदक्षतातज्ञ (Intensivist) कंत्राटी तत्वावरची नियुक्ती आवश्यकता नसल्यास कुठल्याही क्षणी संपुष्टात आणण्यात येईल. अतिदक्षतातज्ञ (Intensivist) कंत्राटी तत्वावरची नियुक्ती ही नियमित तत्वावरिल नियुक्तीकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाही. अतिदक्षतातज्ञ (Intensivist) नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी पदधारकाने चुकीची माहीती प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केल्याने किंवा कोणतीही माहीती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याची नियुक्ती रद्दबादल करण्यात येईल. नियुक्तीच्या वेळी 200 रुपयांच्या बॉन्ड पेपरावर विहित नमुन्यातील कंत्राट करार करुन संबंधीत आस्थापनेस 07 दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक राहील अन्यथा त्याची नियुक्ती रद्दबादल करण्यात येईल. उमेदवाराच्या कंत्राटी तत्वावरिल नेमणूकीनंतर त्रैमासिक अनुपालन अहवाल (performance report) जसे की दैनंदीन उपस्थिती, दिलेल्या सेवेचा संख्यात्मक व गुणात्मक अहवाल यानुसार क्रंत्राटी सेवा पुढे चालू ठेवण्यात येईल.

अतिदक्षतातज्ञ (Intensivist) कंत्राटी तत्वावरिल पदधारकाने नियुक्ती कालावधीत शिस्तभंग केल्याचे निदर्शनास आल्यास त्याची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल. कुठल्याही कारणास्तव पदधारकास पदाचा राजीनामा दयावयाचा असल्यास त्याने एक महिना आधी पुर्वसूचना देणे बंधनकारक आहे. पदधारक विहीत अटि पूर्ण करित नसल्याचे कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास त्याची नियुक्ती त्वरित रद्द करण्यात येईल व याबाबत कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही. पदधारकाने या पदाचे आदेश प्राप्त झाल्यावर सात दिवसाच्या आत त्वरित कर्तव्यार्थ हजर राहावे लागेल अन्यथा सदर पदाच्या नियुक्तीकरिता आपणास स्वारस्य नसल्याचे समजून पुढिल उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जानेवारी 2025 ही आहे तर अर्ज सादर करण्याचा पत्ता: वैद्यकीय अधिक्षक क्षयरोग रुग्णालय यांचे कार्यालयात. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा