
| पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत स्वयंपाकी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी 4थी, 7वी, 10वी, 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. अर्ज केलेल्या उमेदवारांना या भरतीच्या स्वयंपाक प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, तोंडी मुलाखतीसाठी उमेदवारास स्वखर्चाने हजर रहावे लागेल. नियुक्ती व अल्पसुचीचे (shortlisting) सर्व अधिकार प्रशासन, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत.
◾नियम व अटी :
१. उमेदवार कमीत-कमी चौथी पास असावा.
२. उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पूरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.
३. उमेदवार जाहिरात प्रसिद्धिच्या तारखेला १८ वर्षापेक्षा लहान व ३८ वर्षापेक्षा मोठा नसावा. मागासवर्गीयांसाठी कमाल मर्यादा ४३ वर्षाची असेल.
४. उमेदवार न्यायालयीन / शासकीय कर्मचारी असल्यास विहीत मार्गाने अर्ज करणा-या न्यायालयीन / शासकीय कर्मचा-यांसाठी कमाल वयाची अट नाही.
५. त्याचे/तिचे चारित्र्य आणि वर्तणुक चांगली असावी.
६. तो/ती करार करणेस सक्षम असावा/असावी.
७. त्याला/तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा त्याला/तिला कोणत्याही न्यायालय / एम.पी.एस.सी. / यु.पी.एस.सी. किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडींमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : 16 ऑगस्ट 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज स्विकारण्याचा पत्ता : प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रूग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई- ४००००१.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.

