
सरकारी नोकरी शोधताय? नाशिकमध्ये केंद्र सरकारी नोकरी मिळवण्याची वाट बघणाऱ्या सर्व तरुणांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेसमध्ये म्हणजेच चलन नोट प्रेसमध्ये तब्बल 534 रिक्त जागा भरण्यासाठी एक मोठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही भरती ‘सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ मार्फत केली जात असल्याने ही थेट केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधीच आहे. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
| अर्ज कसा कराल | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
या भरतीमध्ये कल्याण अधिकारी, सुरक्षा अधिकारी, पर्यवेक्षक, सचिवालयीन सहाय्यक, ग्राफिक डिझाइन आर्टिस्ट, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक आणि कनिष्ठ तंत्रज्ञ अशी अनेक प्रकारची पदे भरली जाणार आहेत. पदांची संख्या मोठी असल्यामुळे अनेक क्षेत्रातील उमेदवारांना इथे संधी मिळू शकते. साहजिकच प्रत्येक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पूर्णपणे वेगळी असणार आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहात हे पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात एकदा नीट वेळ काढून वाचून घ्या. वयाचा विचार केला तर १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असलेले उमेदवार यासाठी आपला अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा अंदाजे ३०,००० रुपयांच्या आसपास किंवा पदनिहाय त्यापेक्षाही चांगले वेतन दिले जाईल. ही संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून येत्या २० एप्रिल २०२६ पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जून 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला त्यांच्या https://www.google.com/search?q=cnpnashik.spmcil.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तिथे तुम्हाला पात्रता, आरक्षण आणि परीक्षा शुल्काची सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच मगच आपला फॉर्म सबमिट करा जेणेकरून नंतर तुमची कोणतीही गैरसोय होणार नाही.

