सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था भरती 2024 | Jobs In Maharashtra 2024

Jobs In Maharashtra 2024 : सार्वजनिक बांधकाम (PWD) कर्मचारी सहकारी पतसंस्था अंतर्गत सहाय्यक पदाकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवित आहे. एकत्रित मासिक मानधन रु. 16,000/- (अक्षरी रुपये सोळा हजार) आहे. तरी पात्र व उत्सूक्त उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात सार्वजनिक बांधकाम (PWD) कर्मचारी सहकारी पतसंस्था (म.) पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरती बद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

Jobs In Maharashtra 2024 : Public Works (PWD) Employees Cooperative Credit Society is inviting applications from eligible and interested candidates for the post of Assistant. The combined monthly remuneration is Rs. 16000/- (Rupees sixteen thousand in words). Eligible and interested candidates should submit their applications.

भरती विभाग : सार्वजनिक बांधकाम (PWD) कर्मचारी सहकारी पतसंस्था (म.) पुणे द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : सहाय्यक.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 16,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
व्यावसायिक पात्रता :
1] पदवीधर असणे आवश्यक आहे.
2] मराठी टंकलेखन किमान ३० शब्द प्र. मि. किंवा इंग्रजी टंकलेखन किमान ४० शब्द प्र. मि. या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
3] अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾उमेदवारांनी आपले अर्ज वरील पत्त्यावर पोस्टाने अथवा समक्ष आवश्यक पात्रता प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित झेरॉक्स प्रतीसह शुक्रवार दिनांक ६/१२/२०२४ पर्यंत पाठवावेत. त्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾निवडी पलच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करणारा न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दवाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्दबातल केली जाईल.
◾उमेदवारांनी मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी देणे अनिवार्य आहे.
◾सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार सार्वजनिक बांधकाम (PWD) कर्मचारी सहकारी पतसंस्था (म.) पुणे कडे राखून ठेवण्यात आले आहेत.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 06 डिसेंबर 2024.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : नवीन जिल्हा परिषदेजवळ, हॉटेल सागर प्लाझा समोर, कॅम्प, पुणे 411 001.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा