
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई म्हणजेच महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण येथे नवीन रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये खाजगी सचिव व स्वीय सहायक ही पदे भरली जाणार आहेत. एकूण 04 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना ही चांगली संधी आहे.
या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 90,000/- ते रु. 1,10,000/- पर्यंत मासिक पगार दिला जाणार आहे. पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठविताना अर्जदाराने पाकीटावर कोणत्या पदासाठी अर्ज करित आहे हे ठळक अक्षरात लिहावे.
निवड झालेल्या उमेदवारांची सुरूवातीची नियुक्ती ही ११ महिण्याच्या कालावधीकरिता असेल तनंतर उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता आणि उरक पाहूनच उमेदवारास पूढील कालावधीकरिता म्हणजे २ वेळा ११-११ महिण्याची पूनः नियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येईल. महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधीकरण, मुंबई मधील कार्यरत कर्मचारी योग्य त्या पदास आणि पात्रतेनुसार अर्ज सादर करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 21 नोव्हेंबर 2024 तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 डिसेंबर 2024 ही आहे.

