
| पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
| नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
10वी पास असाल आणि काम शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) नवी मुंबई येथे नवीन पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये अपरेंटिस (विजतंत्री) ही पदे भरली जाणार आहेत. एकूण 64 पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये नोकरी शोधत असाल तर ही भरती प्रक्रिया तुमच्यासाठी चांगली संधी आहे.
शैक्षणिक पात्रता, माध्यमिक शालांत परिक्षा उत्र्तीण / ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील. या भरती मध्ये वयोमर्यादा १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम) असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीनें अर्ज करायचे आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 12 ऑगस्ट 2024. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2024. अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख: 06 सप्टेंबर 2024. अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ऐरोली नाका, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई ४००७०८ .

