
| अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, धाराशिव येथे अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन ट्रेड, वायरमन ट्रेड, कॉम्प्युटर ऑपरेटर ट्रेड) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामधे 180 पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी तुम्ही अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन / ऑनलाइन पद्धतीने आहे. विभागनिहाय आस्थापना क्रमांक: -१) धाराशिव विभागासाठी आस्थापना क्र. E09172700015 २) तुळजापुर विभागासाठी आस्थापना क्र. E01182700180.
शैक्षणिक व इतर कागदपत्रांची साक्षांकीत केलेली छायांकित प्रत सादर न करणा-या उमेदवाराच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही. भरती प्रक्रियेत आवश्यकता भासल्यास कोणताही बदल करण्याचे अथवा भरतीच्या कोणत्याही टप्यावर रदद करण्याचे सर्व अधिकार निम्नस्वाक्षरीकार यांना राहतील. उमेदवाराने लोकप्रतिनीधी अथवा राजकिय व्यक्तिकडुन दबाव आणल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी रदद करण्याचे अधिकार निम्नस्वाक्षरीकार यांना राहतील.
भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या संपुर्ण प्रती मंडळ कार्यालय, धाराशिव येथे सादर कराव्यात अपुर्ण कागदपत्रे असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी. उमेदवारांना सुचित करण्यात येते की, अधिकारी यांना भ्रमणध्वनी / दुरध्वनीद्वारे संपर्क करू नये. प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा राहील. निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारास प्रशिक्षण कालावधीत नियमाप्रमाणे विद्यावेतन अदा करण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2024. अर्ज सादर करण्याचा पत्ता: महावितरण मंडळ कार्यालय, धाराशिव, सोलापुर रोड, धाराशिव. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.

