
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (मोबाईल वरून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डेस्कटॉप ऑन करा व मोबाईल आडवा करा.) |
सरकारी नोकरी शोधताय? मुंबई महानगरपालिका मध्ये तब्बल 690 पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. या भरती मध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) ही पदे भरली जात आहेत. जे उमेदवार मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी शोधत आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. वय अ) अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे ब) मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे असणार आहे.
नियम व अटी : प्रस्तुत भरतीप्रक्रियेत अंतीम निर्णय घेण्याचे व प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव सदर भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस, कोणत्याही टप्यावर थांबविण्याचे तसेच निवड प्रक्रियेत कोणत्याही स्तरावर निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना राहतील. जाहिराती मध्ये दिलेल्या पदांची संख्या आणि अनुशेष यात बदल होऊ शकतो. विहित आरक्षणानुसार रिक्त पदांच्या उपलब्धतेप्रमाणे नेमणूका करण्यात येतील. उमेदवार विहित अर्हता अटी/शर्ती पूर्ण करीत नसल्याचे कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल. नेमणूक झाली असल्यास सेवेतून कमी करण्यात येईल व याबाबत कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.
परीक्षा घेतांना काही अडचणी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यामुळे परीक्षा देण्यावर आणि / किंवा परीक्षेचा निकाल तयार होण्यावर परिणाम होऊ शकेल. अशा प्रसंगी उमेदवारांना परीक्षेसाठी इतर केंद्रावर हलविणे किंवा विलंबाने परीक्षा घेणे यासारखे आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. पुर्नपरीक्षेचे आयोजन याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांचा निर्णय अंतिम राहील, ज्या उमेदवारांना अशा प्रकारचा बदल मंजूर नसेल त्या उमेदवारांची उमेदवारी या परीक्षेपुरती रद्द करण्यात येईल. 16 डिसेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात वाचून घ्या.

