Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगर अभियंता खात्याच्या आस्थापनेवरील जाहिरात मध्ये नमूद केलेली 0690 नवीन रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका, नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. मुंबई महानगरपालिका भरतीची पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : 0690 new vacancies mentioned in the advertisement on the establishment of the Municipal Engineer Department in the Brihanmumbai Municipal Corporation are to be filled through direct service. Applications are being invited from eligible candidates through online mode to fill the vacant posts.
◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका, नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालय द्वारे भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही सर्व नवीन रिक्त पदे भरण्यात येत आहेत.
◾एकूण पदे : 0690 जागा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 41,800 ते 1,32,300 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पूर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्ष.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) : सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधील अभियांत्रिकी डिप्लोमा.
▪️कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) : इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रिकल/ उत्पादन अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा.
▪️दुय्यम अभियंता (स्थापत्य) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी.
▪️दुय्यम अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) : मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधील पदवी/ इलेक्ट्रॉनिक्स/उत्पादन अभियांत्रिकीमधील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी (इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर इंजिनिअरिंग) पदवी.
◾उमेदवाराचा ई-मेल आयडी आणि पत्रव्यवहाराचा पत्ता (पिन कोड सह) वैध, सुस्पष्ट व पूर्ण असावा.
◾इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतरित झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांचा आरक्षित पदांकरिता विचार केला जाणार नाही.
◾या भरती प्रक्रीयेअंतर्गत उद्भवणाऱ्या सर्व बाबीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांचा निर्णय अंतिम असेल व तो उमेदवारांना बंधनकारक असेल. यासंबंधात कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार किंवा व्यक्तिगत विचारणा करणा-यांना उत्तर दिले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾प्रत्येक उमेदवाराने दिलेल्या बरोबर व चुकीच्या उत्तरांचा पॅटर्न इतर उमेदवारांच्या उत्तरांशी जुळवून तपासला जाईल. जर, दोन किंवा अधिक उमेदवारांचा उत्तरांच्या पॅटर्न मध्ये शंकास्पद समानता आढळल्यास सदर उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार महानगरपालिका आयुक्तांना असेल.
◾सरळसेवा भरतीकरिता घेण्यात येणा-या ऑनलाईन परिक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी / फेरतपासणी केली जाणार नाही. अथवा या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या अभिवेदनावर कार्यवाही केली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾कनिष्ठ अभियंता पदांकरिता घेण्यात येणा-या परीक्षेचा दर्जा भारतातील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) व तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) या मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदविका परीक्षेच्या समान राहील.
◾सर्व परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येतील.
◾ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या सामाईक गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व समांतर आरक्षणानुसार तात्पुरती / अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 16 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


