
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
दि खामगांव अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. येथे नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये बँकेस प्रोबेशनरी / ट्रेनी लिपीक ही एकूण 30 पदे भरली जाणार आहेत. या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचे नोकरी ठिकाण हे बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, संभाजीनगर, जळगाव आणि बुरहानपूर यापैकी कुठेही असू शकते. शैक्षणिक पात्रता: पदवी द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन / मानधन ट्रेनी कालावधी मध्ये एकत्रीत रु. १७,००० तसेच प्रोबेशनरी कालावधी मध्ये एकत्रीत रु. २२,००० दिले जाणार आहे. वयोमर्यादा ही ३० वर्षापेक्षा जास्त नसावी (दि. ३१/१२/२०२४ पर्यंत) या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. या जाहिरातीच्या प्रसिध्दी करणापूर्वी तसेच दिनांक १३/०१/२०२५ नंतर आलेल्या, परिक्षा फी डिमांड ड्राफ्ट शिवाय प्राप्त झालेल्या तसेच विहीत नमुन्यात कुठल्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अर्जाचा विहीत नमुना बँकेच्या वेबसाईटवर www.khamgaonbank. in उपलब्ध आहे. अर्जात आवश्यक माहिती पूर्णपणे भरलेली असावी, अपूर्ण अर्ज अपात्र समजण्यात येतील. अर्जासोबत कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती पाठवाव्यात. या संपूर्ण प्रक्रियेत बँकेचा निर्णय अंतीम राहील. अर्जाच्या “लिफाफ्यावर ट्रेनी लिपीक पदासाठी अर्ज” तसेच प्रेषक म्हणून स्वतःचे नाव व संपूर्ण पत्ता लिहून अर्ज खालील पत्त्यावर पाठवावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जानेवारी 2025 ही आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता हा मुख्य कार्यकारी अधिकारी, दि खामगांव अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि., खामगांव. (मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक) मुख्य कार्यालय : “धनवर्धिनी” श्रीराम शालीग्राम प्लॉट, खामगांव, जि. बुलढाणा – ४४४३०३. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.

