NHM Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान व 15 वा वित्त आयोग अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अधिनिस्त खालीलप्रमाणे स्टाफ नर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर, प्रोग्राम असिस्टंट, पॅरामेडिकल वर्कर, लॅब टेक्निशियन, आरोग्य सेवक / सेविका, इतर एकूण 0195 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविणेत येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान, तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
NHM Bharti 2025 : Applications are being invited for filling up a total of 0195 vacancies under the National Health Mission and 15th Finance Commission under the District Integrated Health and Family Welfare Society as follows: Staff Nurse, Data Entry Operator, Program Assistant, Paramedical Worker, Lab Technician, Health Servant/Servant, Others.
⚠️ महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा परिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर, आरोग्य सेवक / आरोग्य सेविका, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾ मासिक मानधन / वेतन : 20,000 ते 30,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखती घेऊन निवड केली जाईल.
◾वयोमर्यादा : 43 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : 11 महिने 29 दिवस या कालावधीसाठी कंत्राटी पधतीने रिक्त पदे भरणेकरिता ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्पेयर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, प्रोग्राम मॅनेजर, स्टाफ नर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर, प्रोग्राम असिस्टंट, पॅरामेडिकल वर्कर, लॅब टेक्निशियन, सुविधा व्यवस्थापक, आरोग्य सेविका, इतर पदे
◾इतर आवश्यक पात्रता : शैक्षणिक / व्यावसायिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾एकूण पदे : 0195 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग. (Jobs in Sindhudurg)
◾उपरोक्त पदे ही निव्वळ कंत्राटी असुन राज्य शासनाची नियमित पदे नाहीत. शासकीय नियमित सेवेत सामावून घेणेबाबत किंवा शासनाकडे सेवा संरक्षणासाठी दावा करणेचे कोणतेही अधिकार नियुक्त उमेदृवारास राहणार नाहीत.
◾उपरोक्त पदांसाठी विहित सामाजिक प्रवर्गातील इच्छुक पात्र उमेदवारांनी दि. 01/01 / 2025 ते दिनांक 10/01/ 2025 या कालावधीतील सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5. 30 वाजेपर्यंत (सुट्टट्टीचे दिवस वगळून) संकेतस्थळावरील जाहिरातीत नमुद केलेल्या कागदपत्रासह व संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना सुचित केलेप्रमाणे भरणेचा आहे.
◾सुस्पष्ट भरलेले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी मु.पो ओरोस तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांचे नाते राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM, SINDHUDURG) व पदाचे नावाचा स्पष्ट उल्लेख करुन अर्ज सादर करावेत. तसेच पोष्टाने प्राप्त होणारे अर्ज विहित कालावधीत प्राप्त होतील याची उमेश्वाराने दखल घ्यावी.
◾विहित प्रमाणपत्राबाबत अर्जासोबत वयाचा सबळ पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र या दोहोंपैकी एक, ज्या पदासाठी आवश्यकता आहे तिथे 12 वी चे गुणपत्रक, तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एसटीएलएस, स्टाफ नर्स, वैदकिय अधिकारी, स्पेशालिस्ट व सुपर स्पेशालिस्ट पदांसाठी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र (Renewal Slip/ Smart Card) अंतिम वर्षाचे गुणपत्रक, अंतिम वर्षाला दोन सेमिस्टार असतील तर दोन्ही गुणपत्रके जोडणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदृवारांनी जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. ज्या प्रमाणपत्रांमध्ये Grading System नुसार गुण असतील (CGPA/ SGPA) तर प्रमाणपत्रामागील Grade Card झेरॉक्स अर्जासोबत जोडणेत यावी. अर्जासोबत जोडलेल्या सर्व प्रमाणपत्रके साक्षांकित / स्वसाक्षांकित करणे आवश्यक आहे. उच्च शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या उत्तीर्ण वर्षाची मार्कलिस्ट व प्रमाणपत्रकांच्या साक्षांकित प्रती, पदाशी निगडीत कामाचे अनुभव प्रमाणपत्र, उच्च शैक्षणिक अर्हताधारक असेल तर प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी मु.पो ओरोस तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


