नवीन : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये चांगल्या वेतनाची नोकरी मिळवा | pdf जाहिरात व अर्ज येथे उपलब्ध.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (सल्लागार) ही एकूण 08 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 1,25,000 /- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) आहे. या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 12 डिसेंबर 2024 ही आहे. मुलाखतीची पत्ता: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पदव्युत्तर संस्था, दुसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, संत तुकारामनगर पिंपरी-18.

नियम व अटी : उमेदवारांची पात्रता व अनुभवाच्या मुळ कागदपत्रासह एक पासपोर्ट आकाराचा फोटो व आवश्यक मुळ कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीचा एक संच घेवुन मुलाखतीस हजर रहाणे आवश्यक आहे. सदर अर्ज नमुना व मुल्यांकन पध्दत नमुना मनपा वेबसाईटवर उपलब्ध आहे. उमेदवारांच्या जन्म तारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची सांक्षाकिंत प्रत अथवा जन्मतारखेची नोंद असलेली शालांत परिक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. उमेदवार मागसवर्गीय असलेल्या जातीचा स्पष्ट उल्लेख करुन कोणकोणत्या प्रवर्गात मोडत आहे, याचा उल्लेख करावा. वरिल पदे ही संपुर्णपणे कंत्राटी स्वरुपाची असल्याने या पदावर कायम स्वरुपाची नियुक्ती मागण्याचा हक्क असणार नाही. वरिल पदासाठी कामाचे स्वरुप ठरविण्याचे सर्वस्वी अधिकार पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय प्रमुखांना राहतील.

सदर पदांना नमुद केलेनुसार रुग्णालयाच्या सोईनुसार सेवा देणे बंधनकारक असेल तथापी पदांची कामकाजाची वेळ निश्चित करण्याचे अधिकार पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय विभाग प्रमुख तसेच रुग्णालय प्रमुख यांचे असतील. अपात्र ठरविलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. बोलविलेल्या उमेदवारांस नियुक्ती देण्याबाबतचे सर्व अधिकार मा. महापालिका आयुक्त यांनी स्वतःकडे राखुन ठेवलेले आहेत या बाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही. निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर, अर्जदार अर्हता धारण न करणारा आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, सेवा देण्यास टाळाटाळ केल्यास, रुग्णालयाची वेळ न पाळल्यास व दबावतंत्राचा वापर करताना आढळल्यास कामकाज/नियुक्ती आदेश रद्द करणेत येईल. सदर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असुन सदरहू भरती प्रक्रिया संदर्भात अधिक माहिती नमुद संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा