नागरी सहकारी बँक भरती 2025 | मासिक वेतन : 17,000 ते 22,000 रूपये | Urban Bank Bharti 2025

Urban Bank Bharti 2025 : अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक ही मल्टीस्टेट शेड्युल्ड सहकारी बैंक आहे. बँकेचे मुख्य कार्यालय, खामगांव येथे असून, शाखा विस्तार बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, छ. संभाजीनगर, जळगांव तथा बुऱ्हाणपूर या जिल्ह्यांमध्ये आहे. बँकेस रिक्त पदांसाठी भरती करावयाची असून, त्याकरीता खालील पात्रता धारकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Urban Bank Bharti 2025 : Urban Co-operative Bank is a multistate scheduled cooperative bank. The bank has its head office at Khamgaon and the bank is recruiting for the vacant posts, for which applications are invited from the following qualified candidates.
⚠️ महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : 17,000 ते 22,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : ३० वर्षापेक्षा जास्त नसावी.
पदाचे नाव : बँकेस प्रोबेशनरी / ट्रेनी लिपीक.
इतर आवश्यक पात्रता :
अ) महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही विद्यापीठातील (१०+२+३ पॅटर्न नुसार प्राप्त) पदवी द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण.
ब) मराठी, हिन्दी व इंग्रजी लिहीता वाचता व बोलता येणे आवश्यक असून, संगणकावर काम करता येणे आवश्यक आहे.
क) नागरी सहकारी बैंक किंवा अन्य प्रायव्हेट सेक्टर बँकेतील / पतसंस्थेतील किमान लिपीक किंवा अधिकारी पदावरील कामाच्या अनुभवास प्राधान्य.
एकूण पदे : 030 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, संभाजीनगर, जळगाव आणि बुरहानपूर.
◾लेखी परिक्षा तसेच तद्नंतरची प्रक्रिया या करीताची फी रु. १,०००/- (GST सह.) असेल जी उमेदवारास अर्जासोबत भरावी लागेल. सदरची फी कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही.
◾लेखी परिक्षा, कामाचा अनुभव यांचे गुणांकनाचे आधारे अंतीम यादी तयार केली जाईल. या यादी पैकी, करावयाच्या अंतिम यादी करीता आवश्यक संख्येच्या ३ पट उमेदवारांना व्यक्तीगत मुलाखती करीता पाचारण करण्यात येईल.
◾वरील पदावर नियुक्त उमेदवारास / व्यक्तीस बँकेच्या कामाच्या सोयीच्या दृष्टीने ट्रेनी लिपीक १ वर्ष व प्रोबेशनरी लिपीक १ वर्ष या पदावर काम करावे लागेल. तसेच नियुक्तीचे वेळी उमेदवारास सुरक्षा ठेव रु. १.०० लाख. बँकेत जमा करावी लागेल.
◾वरील पद बँकेच्या धोरणानुसार आणि प्रोबेशनरी कालावधीतील काम बैंकेस समाधानकारक वाटल्यास कायम स्वरुपी भरण्यात येतील. मात्र हे बँकेस बंधनकारक असणार नाही.
◾इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहीत नमुन्यात अर्जासोबत फी रक्कमेचा डिमांड ड्राफट जोडावा.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 13 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, दि खामगांव अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि., खामगांव. (मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक) मुख्य कार्यालय : “धनवर्धिनी” श्रीराम शालीग्राम प्लॉट, खामगांव, जि. बुलढाणा – ४४४ ३०३.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा